धाराशिव – राज्य सरकारच्या दि. १० जून २०२५ रोजीच्या निर्णयानुसार सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय हा बेरोजगार तरुणांवर अन्याय करणारा असून, तो तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी तीव्र मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.
या मागणीसाठी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर केले. त्यांनी नमूद केले की, हा निर्णय शेतकरी, बहुजन, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणारा आहे.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा,कंत्राटी पद्धतीने नोकर भरती थांबवावी,नोकरीची वयोमर्यादा ५८ वर्षांवरच कायम ठेवावी,राज्य शासनातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत आदी.
राजाभाऊ राऊत यांनी स्पष्ट इशारा दिला की,जर हा निर्णय शासनाने मागे घेतला नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला