August 8, 2025

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांचा शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलनातून निषेध

  • कळंब – परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकरी विरोधी, आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधानाचा कळंब येथे शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला.
    छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्यावतीने दि.२७ जून २०२५ रोजी सकाळी दहाच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून,अशा वक्त्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाई होण्याची मागणी करण्यात आली.
  • शिवसेनेच्यावतीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी “शेतकरी हा अन्नदाता आहे”, “शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत संताप व्यक्त केला.
    या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे यांनी केले. त्यांच्या सोबत प्रदीप मेटे, दिलीप पाटील,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,शाम खबाले, शंकर वाघमारे, सुधीर भवर, शकील काजी, अमर गायकवाड, सागर बाराते, मनोहर धोंगडे, विश्वजीत जाधव, पंडित देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
    आंदोलनात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने आमदार बबनराव लोणीकर यांचा राजीनामा घेण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी केली.
error: Content is protected !!