धाराशिव (जिमाका) – विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करून सामाजिक समतेचा आदर्श ठेवावा,”असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला.जिल्हास्तर,तालुका स्तर आणि ग्रामपातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.धाराशिव येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मैनाक घोष होते.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव,अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सचिन कवळे यांनी केले.या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक भैरवनाथ कानडे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना जागृती आणि प्रेरणादायी विचार दिले. यावेळी सन २०२३-२४ मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.राज्य शासनाचा “साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार” भगवान पुंडलिक वाघमारे आणि पांडुरंग शंकर घोडके यांना प्रदान करण्यात आला.”शाहू,फुले,आंबेडकर पुरस्कार” विजेते जनक पाटील यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व,निबंध व एकपात्री नाट्य स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली.वक्तृत्व स्पर्धेत स्वानंदी माने, सिध्दी पाटील व प्रेरणा गुंटुरे,तर निबंध स्पर्धेत वेदश्री सरवदे,रागिनी घुटे व तृप्ती सोनटक्के यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.एकपात्री नाट्य स्पर्धेत सचिन शिंदे,प्रेरणा देशमुख व गुलनुर शेख विजेते ठरले.विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार रुपये,३ हजार रू व २ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. “छत्रपती शाहू महाराज गुणवंता पुरस्कार” प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत निवडक प्रमाणपत्रांचे वाटपही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील २०० ते २५० विद्यार्थी,वसतिगृह व निवासी शाळांतील मुख्याध्यापक,शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक जगताप (बावी) यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाय.एस.चव्हाण यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला