August 8, 2025

मातोळा येथे सा.साक्षी पावनज्योतचा डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन

  • मातोळा– मराठवाड्यातील ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘ज्ञान दीप लावू जगी’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीतून साकारलेले सा.साक्षी पावनज्योतचा सचिव शिक्षणतज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक २६ जून २०२५ रोजी गुरुवारी करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराज व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
  • यावेळी प्राचार्य अजित साळवे यांना प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके लिखित विरूंगुळा हे अग्रलेख व पथनाट्यांचा संग्रह असलेले पुस्तक सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक कार्यातील समर्पण, त्याग आणि दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला.त्यांनी सांगितले की,गुरुजींच्या कार्यातून हजारो विद्यार्थी घडले,आणि आजही त्यांची शिकवण ‘साक्षी पावनज्योत’च्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचते आहे.
    याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!