June 25, 2025

श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत

  • कळंब (महेश फाटक ) – दि.२४ जून २०२५ रोजी
    चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील गुलाब महाराज संस्थान दिंडीचे कळंबमध्ये आगमन झाले. सुरुवातीला पालखीचे पूजन करण्यात आले.नंतर अल्प उपहाराची सोय करण्यात आली. नाश्त्याची परंपरा चालक-मालक संघटना करत आहे.ही दिंडी चांदूरबाजार येथून जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर १५० ते २०० वारकऱ्यांना सोबत घेऊन कळंब येथे दाखल होते.मांजरा काट वरील महादेव मंदिर येथे आगमन होताच चालक-मालक संघटनेमधील सर्व सेवेकरी फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये त्यांचे स्वागत करतात व दिंडी मधील गायनाचार्य च्या गोड अभंग मध्ये चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी भक्ती भावाने लीन होऊन मंत्रमुग्ध होतात टाळ मृदंगाच्या ठेक्यावर नाचण्याचा आनंद घेतात.तसेच दिंडी मधील वारकरी आणि सेवेकरी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.नंतर आरती होऊन दिंडी कळंब शहरात दाखल होते .येथील अन्नदाते बंडोपंत दशरथ हे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतात. त्यानंतर दिंडी हासेगाव (केज) येथील विश्वंभर पाटील हे त्यांची संध्याकाळच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था करतात. सकाळी दिंडी पंढरपूर कडे मार्गस्थ होते.यावेळी उपस्थित सेवेकरी.महादेव थोरात,अण्णा पवार,संजय वैद्य,गोविंद लांडगे,अशोक इखे,रमेश इखे,दादा सोनवणे,हुंबे तात्या,नेताजी जाधव,नागेश खरडकर,नागेश माने, बप्पा झरकर,जनक घाडगे,वसंत तोडकर,जोगदंड बापू, पोपट इंगळे,दत्ता वाघमोडे, हंडीबाग नाना,बाळू अंबिरकर,अमोल अडसूळ व इतर सर्व चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.
error: Content is protected !!