कळंब ( माधवसिंग राजपूत ) – टाळ वाजतो! मृदंग वाजतो !! देव संतांच्या मेळ्यात नाचतो !! हे भजन गात शेगांव ते पंढरपूर संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या पालखीचे कळंब शहरात आगमन होताच जल्लोषात उत्साहात भक्तांनी हरिनामाच्या गजरात व गण गण गणात बोते म्हणत स्वागत केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संजय पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, तहसीलदार हेमंत ढोकले, नगरपरिषद मुख्याधिकारी मंजुषा गुरमे,नायब तहसीलदार गोपालदास तापडिया,पोलीस निरीक्षक रवी सानप,पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रभापुंडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी (आप्पा) कापसे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग (तात्या) कुंभार, यांच्यासह भावी भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले. संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी शेगांव येथून २ जुन रोजी निघाली आसुन तब्बल २२ दिवस पायी प्रवास करत २३ जुन रोजी कळंब शहरात दाखल झाली. या दिंडीची सुरुवात १९६८ झाली व हे वारीचे ५७ वे वर्ष आहे. धाराशिव ,बीड जिल्ह्याच्या सिमेवरिल मांजरा नदी पुलावर या पालखीचे कळंब शहरातील भक्तांनी स्वागत केले या दिंडीत ७५० सहभागी वारकरी,हातात भगवा पताका मुखी हरि नामाचा गजर करत लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनास दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूर कडे निघालेले आहेत. अनु ,रेणू मध्ये ब्रह्मव्यापीला ! लय उत्पत्ती समान प्रगटला!! गजानन महाराज योगी महान !!! आशा भजनाच्या ठेक्यात एका शिस्त बध्द पध्दतीने ही दिंडी कळंब शहरातील परळी रोड , डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,अहिल्याबाई होळकर चौक मार्गे नगरपरिषद शाळा क्रमांक – १ मैदानात मुक्कामाच्या ठिकाणी पोहचली. पालखी मिरवणूक मार्गात चौका ,चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या पालखी मार्गत अनेक भक्तांनी पाणी, फळे, लाडूचे वाटप वारकऱ्यांना केले . मुक्कामाच्या ठिकाणी भाविकानी मोठ्या रांगा लावून दर्शन घेतले या ठिकाणी कीर्तन सेवचे आयोजन या ठिकाणी प्रसादाचे तसेच खेळणीचे स्टॉल लावण्यात आले होते ,ननाभीक मंडळातर्फे वारकऱ्यांची दाढी, कंटिगची मोफत सोय करण्यात आली. तसेच कळंब शहरातील अन्नदाते बापुराव करंजकर यांनी दरवर्षी प्रमाणे वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था केली होती आजचा मुक्काम झाल्यानंतर उद्या दिनांक २४ जून रोजी सकाळी ६.०० वाजताही दिंडी पुढच्या प्रवासासाठी ढोकी रोड मार्गाने मार्गक्रमण करेल दुपारी गोविंदपूर येथे विसावा तर रात्रीचा मुक्काम तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, ढोकी येथे असेल. नगरपरिषदेकडुन स्वच्छता पिण्याचे पाणी,अग्निशमन गाडी ही व्यवस्था सज्ज होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड