धाराशिव (जिमाका) – २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत देशात आणिबाणी लागू करण्यात आली होती.या घटनेला २५ जून २०२५ रोजी ५० वर्ष पूर्ण होत आहे.या लोकशाहीच्या लढ्यासंदर्भातील सचित्र प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार २५ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या सचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बंदीवास सोसलेल्या व्यक्तीची माहिती व त्याअनुषंगाने देशात घडलेल्या विविध घटना-घडामोडींच्या माहितीचा समावेश असणार आहे. यावेळी बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तीचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात येणार आहे.या सचित्र माहिती प्रदर्शनास नागरिकांनी भेट दयावी.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान