June 23, 2025

मोहेकर महाविद्यालयांमध्ये ऑलिंपिक डे साजरा

  • कळंब – जागतिक स्तरावर ऑलिंपिक डे (International Olympic Day) दि.२३ जून २०२४ रोजी साजरा केला जात आहे.१८९४ मध्ये पॅरिसमधील सोर्बॉन येथे बॅराँ पिएर दे कूबर्टिन यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटी (IOC) स्थापन केली होती. त्यानंतर १९४८ पासून प्रत्येक वर्षी २३ जून रोजी हा दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो.याचं याच अनुषंगाने ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथे ऑलम्पिक दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,संस्थेचे संचालक डॉ.संजय कांबळे,उपप्राचार्य प्रा.आप्पासाहेब मिटकरी,कबड्डी असोसिएशनचे लक्ष्मण (तात्या) मोहिते,क्रीडा शिक्षिका प्रा. सरस्वती वायबसे,क्रीडा शिक्षक डॉ.आप्पासाहेब बोन्दर,प्रा.वसंत मडके,प्रा.मीनाक्षी जाधव,प्रा. घाटपारडे, प्रा.बारकूल, प्रा. उन्हाळे,प्रा.कदम हे उपस्थित होते. त्यांनी गुणवंत खेळाडूंनाचे सत्कार केले व प्रा.सुरज गपाट यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले.
error: Content is protected !!