March 26, 2026

दर्जेदार शिक्षण,उत्कृष्ट जेवण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था – अरुण घोगरे

  • धाराशिव (अविनाश घोडके यांजकडून ) – सन १९४५ पासून उपळे रयत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने हरिभाऊ घोगरे हायस्कूल उपळा,भाई उद्धवराव पाटील प्रशाला धाराशिव मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण देऊन थोर महापुरुषांचे विचार आणि कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्याचे कार्य सुरू आहे.दर्जेदार शिक्षणाबरोबरच अंधश्रद्धा व जातीयता मुक्त पिढी घडविण्याचे काम जाणीव पूर्वक केले असल्यानेच ह्या संस्थेतील विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यावर पोहोचला असल्याचे मानसिक समाधान संस्था सचिव अरुण (बापू) घोगरे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ बोलण्यातून व्यक्त केले.
    शाळेतील नवीन प्रवेशा संबंधी व विद्यार्थ्यांच्या बोर्डिंग विषयी विचारले असता बापू म्हणाले की, उपळा,धाराशीव,माणकेश्वर,मुरुड अकोला,किणी,कोंड येथील शाळेतून ग्रामीण व शहरी भागातील मुला-मुलींच्या दर्जेदार शिक्षणाबरोबरच सर्व सुविधायुक्त राहण्याची व जेवणाची उत्तम आणि उत्कृष्ट अशी मोफत सोय केलेली आहे.
    जातीयवादी शक्ती व राज्यकर्त्याकडून लोकशाही आणि संविधान मोडीत काढण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी, सुसंस्कार मय पिढी घडवण्यासाठी व संविधानिक मूल्य जोपासण्यासाठी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त संख्येने उपळे रयत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सोयीस्कर असणाऱ्या कोणत्याही शाळेत व बोर्डिंग मध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.
error: Content is protected !!