धाराशिव (जिमाका) – ओएनजीसीच्या (Oil and Natural Gas Corporation Ltd.) सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोकन यंत्र (Dibbler),मानव चलित बीज प्रक्रिया ड्रम व मोटार चलित बीज प्रक्रिया ड्रम यासारख्या अत्याधुनिक घटकांवर ९० टक्केपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अनुदान व पात्रता तपशील : टोकन यंत्र (Dibbler) – पात्रता : वैयक्तिक शेतकरी,शेतकरी गट, एफपीओ,अनुदान : किंमतीच्या ९० टक्के किंवा १ हजार रुपयेपर्यंत.अनुसूचित जाती-जमाती,महिला शेतकरी यांना प्राधान्य.
मानव चलित बीज प्रक्रिया ड्रम (Manual).-अनुदान : एकूण किंमतीच्या ९० टक्के किंवा ९ हजार रुपयांपर्यंत.इतर अटी व प्राधान्यक्रम वरीलप्रमाणे.मोटार चलित बीज प्रक्रिया ड्रम (Motor) -अनुदान: किंमतीच्या ९० टक्के किंवा ३५ हजार ५५० रुपयांपर्यंत. प्राधान्य : FPO > शेतकरी गट > वैयक्तिक शेतकरी. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ‘लकी ड्रॉ’ पद्धत वापरली जाईल.घटकांवर अनुदान देण्यापूर्वी GPS तपासणी केली जाईल व अनुदान थेट डीबीटीद्वारे खात्यावर जमा होईल. तालुका निहाय लाभार्थी लक्ष्य (प्रमुख घटकांसाठी) निश्चित केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव (०२४७२) २२७११८,२२७०६४ तसेच स्थानिक तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला