कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखालील कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील छत्रपती संभाजी विद्यालय मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व पुस्तके वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेत मुख्याध्यापक संभाजी गिड्डे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत पवार,उपाध्यक्ष गजेंद्र समुद्रे,शिक्षण प्रेमी लक्ष्मण लोमटे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सावंत यांनी केले. तर उपस्थित आमचे आभार धनंजय डोळस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत लोहार,अशोक सावंत, पृथ्वीराज लोमटे,श्रीकांत तांबारे,उस्मान शेख,ओम डिकले यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले