कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार निपाणी ता.कळंब येथील महिला शेतकरी शेख परवीन फकरुद्दीन यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केला आहे. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. गेल्या तीन वर्षांपासून कळंब तालुक्यातील शेती मध्ये अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या पूर्वी नामदेव माकोडे,लिंबा नाना चोंदे,अप्पासाहेब काळे यांना सन्मानित करण्यात आले होते. या वर्षी शेती मध्ये विविध प्रयोग करून,शेतकऱ्या पुढे आदर्श निर्माण करणाऱ्या निपाणी तालुका कळंब येथील महिला शेतकरी परवीन फकरुद्दीन शेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी