June 19, 2025

बाजार समितीत पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचे स्वागत व वृक्षारोपण कार्यक्रम

  • कळंब – महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या कळंब दौऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वागत, सत्कार व बाजार समिती परिसरात वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.स्वागत सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी (आप्पा) कापसे,उपसभापती श्रीधर (बाबा) भवर यांनी नामदार प्रतापजी सरनाईक व उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रमुख उपस्थितात शिवसेना नेते अजितदादा पिंगळे , शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंखे,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण,देवकते,किरण गायकवाड,संचालक रोहन शेठ पारख,नगरसेवक अतुलजी कवडे ,मुस्ताक शेठ कुरेशी,विजय भैय्या पारवे,सुरेशजी शिंदे , रामदास चौधरी ,युवा नेते ईश्वर शिंदे,कृष्णा हुरगट व नुतन प्रवेश केलेले अमर बाबु चाऊस व ईतर कार्यकर्ते व व्यापारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे नियोजन कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ यांनी व सूत्रसंचालन राजेंद्र बिक्कड यांनी केले.
error: Content is protected !!