लातूर – हवामान खात्याने येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाही लातूर महानगरपालिकेने शहरातील नालेसफाई वेळेवर न केल्यामुळे स्लम भागांमध्ये पावसाचे पाणी घरामध्ये शिरले.यामुळे गोरगरीब नागरिकांचे अन्नधान्य,कपडे, तसेच घरातील मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही संपूर्ण परिस्थिती महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे घडली असून,यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि नागरिकांचे नुकसान त्वरित भरून काढावे,अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. या घटनेविरोधात भीम आर्मीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी म्हटले आहे की, “जर महानगरपालिकेने नागरिकांचे नुकसान भरून न दिल्यास,भीम आर्मीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे