June 19, 2025

सर्वोदय विद्यालय भोगजी येथे दहावी गुणवंताचा सत्कार

  • कळंब – तालुक्यातील भोगजी येथील सर्वोदय विद्यालय येथे आज दहावी मार्च 2025 निकालातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव संजय जाधवर व शाळेचे मुख्याध्यापक गौतम जाधवर यांच्या शुभ हस्ते सन्मानाचा पुष्पगुच्छ व मायेची शाल देवून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक गौतम जाधवर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे सचिव संजय जाधवर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.तसेच पालक प्रकाश खराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक रामहरी मुंडे व आभार प्रदर्शन चंद्रकांत वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सहशिक्षक फिरोज शेख, प्रियंका घुले व शिक्षकेत्तर कर्मचारी चंद्रकांत खराटे, सुनील हंगे, दीपक घुगे, भागवत शिंदे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!