धाराशिव (जिमाका) – भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी “स्टँड अप इंडिया” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १८ वर्षांवरील पात्र नवउद्योजकांना १० टक्के स्वहिस्सा भरण्यानंतर व बँकेकडून ७५ टक्के कर्ज मंजूर झाल्यास,उर्वरित १५ टक्के रक्कम राज्य शासनाकडून फ्रंट एंड सबसिडी स्वरूपात देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन