धाराशिव (जिमाका)- जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ करीता विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. २० मे ते ६ जून २०२५ या कालावधीत इच्छुक लाभार्थींनी अर्ज सादर करावेत. या योजनांमध्ये अनुसूचित जातींसाठी पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण,दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम,वैरण बियाणे वाटप आणि विधवा महिलांसाठी १०० टक्के अनुदानावर दोन शेळ्यांचा गट वाटप यांचा समावेश आहे. अर्जाचा विहित नमुना,मार्गदर्शक सूचना,नियम,अटी आणि आवश्यक कागदपत्रांची यादी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात तसेच आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहे.अधिक माहिती आणि अर्ज नमुने जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर Dharashiv.nic.in वर देखील उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन