June 20, 2025

व्ही.एस.पँथर्स आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात संपन्न

  • लातूर- लातूर येथील व्ही.एस. पँथर्स युवा संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सहाव्या सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्यात 38 जोडपी विवाहबद्ध झाली. यामध्ये मुस्लिम धर्मीय दोन,हिंदू धर्मीय 11 आणि बौद्ध धर्मीय 25 जोडपी होती.या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक पूर्णतः अंध जोडपे होते.या विवाहसोहळ्यामध्ये सर्व जोडप्याचा विवाह त्यांच्या त्यांच्या धार्मिक विधी नुसार करण्यात आला. बौद्ध धर्मियांचा विवाह संपन्न करण्यासाठी पूजनीय भन्ते डॉ.उपगुप्त थेरो, भन्ते महाविरो बौद्धांचार्य केशव कांबळे,असित कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.तसेच हिंदू धर्मियांचा विवाह पुरोहितांच्या हस्ते संपन्न करण्यात आला तसेच मुस्लिम धर्मियांचा विवाह काजी नी संपन्न केला. या सर्व धर्मीय समुद्र विवाह सोहळ्यामधील नवदांपत्यांना शुभाशीर्वाद प्रदान करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रद्धेय भीमराव आंबेडकर,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा निलंगा चे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,आमदार अभिमन्यू पवार,शिक्षक आमदार विक्रमजी काळे,माजी मंत्री विनायकरावजी पाटील,माजी खासदार सुनील गायकवाड,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव बेंद्रे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे,माजी महापौर अख्तर मिस्त्री,प्रसिद्ध सीए सचिन शिंदे, भाजपा नेत्या प्रेरणा होनराव, माजी नगरसेविका रागिनी यादव, वंचितचे महासचिव रमेश गायकवाड,वंचित जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद,सचिन लामतुरे, वंचितच्या महिला शहराध्यक्ष सुजाता ताई अजनी कर, एडवोकेट विनोद मुळे,एडवोकेट रुपेश थोरमोटे एडवोकेट सचिन जावळे पत्रकार दीप रत्न निलंगेकर हणमंत राचट्टे विकास नरहारे ,दर्शन मसलेकर ,अफजल कुरेशी एम आय एम चे बरकत काजी ,पंकज शिंदे एडवोकेट सचिन कांबळे माजी नगरसेवक अजित पाटील कवेकर नेताजी बादाडे महेश काळे चंदू बगडे सह आदी मान्यवर उपस्थित होते . समारोहाच्या सुरवातीला भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा संघटनेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला .
    यानंतर संघटनेचे मार्गदर्शक रवि कुरील यांनी प्रस्तविकाच्या माध्यमातून संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांची आणि संघटनेने केलेल्या विविध आंदोलनाविषयी, मोर्चा विषयी माहिती दिली यानंतर सं अध्यक्ष विनोद खटके यांनी सांगितले की माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकऱ्यांचा प्रचंड मेहनतीतून हा विवाह सोहळा संपन्न होत आहे , चांगले काम करत असताना चांगल्या कार्याला मदत करणारे खूप दानशूर लोक मला या कार्यात मदत करतात ,शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मान्यवरांची कशी मदत होते हे देखील उदाहरण देऊन सांगितले आज घडीला संघटनेच्या वतीने 100 जोडपी विवाहबद्ध करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे असे सांगितले .यानंतर संभाजीराव पाटील यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले यांनी नेहमीच आपल्या सोबत राहू असे आश्वासन दिले यानंतर अभिमन्यू पवार यांनी व्ही एस पँथर्स च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यानंतर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.यानंतर श्रद्धेय भीमराव आंबेडकर यांनी व्ही एस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एवढा स्तुत्त्य उपक्रम राबवून गरीब पालकांची मदत करीत आहात या बद्दल खूप खूप कौतुक केले . मान्यवरांच्या मनोगतनंतर सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा विवाह विधी संपन्न करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने नवदांपत्यांना मनी मंगळसूत्र जोडवे विवाहसाठी लागणारे पोशाख गादी पलंग संसार उपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले तसेच विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या वराडी मंडळीसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी संघटनेने निर्माण केलेल्या विविध समित्यांनी आपले कार्य चोख पार पाडले. या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके आणि प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ मस्के यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शक संतोष मांदळे रवी कुरील संपर्कप्रमुख आनंद जाधव ग्रुप अध्यक्ष अमोल कांबळे मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे जिल्हाध्यक्ष शरद किणीकर समिती कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष देवा गायकवाड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे विधी विभाग जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रतीक कांबळे ग्रुप जिल्हाध्यक्ष अजय सूर्यवंशी शहराध्यक्ष असच शेख औसा तालुका अध्यक्ष सुनील सातपुते चाकुर तालुका अध्यक्ष अजय वाघमारे निलंगा तालुकाध्यक्ष दाजी कांबळे रेनापुर तालुका अध्यक्ष राज तर कसे लातूर तालुका अध्यक्ष बंटी कांबळे ग्रुप तालुका अध्यक्ष सुनील आदमाने ग्रुप शहराध्यक्ष संतोष जाधव सुरज सूर्यवंशी गौसभाई शेख अतुल होळकर मनोज गायकवाड ऑटो युनियन शहराध्यक्ष शाहरुख मणियार उपाध्यक्ष जगदीश सरवदे ऑटो युनियन जिल्हा उपाध्यक्ष विलास कसबे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड यासीन शेख रमजान शेख सज्जन शेख सिद्धार्थ वाकचौरे विनोद वाघचौरे विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ऋषी ढगे पंकज पाचपिंडे कामगार आघाडीचे हुसेन मादळे रवी कांबळे विकी खटके गोपाळ कांबळे गिरीश पवार अजय सूर्यवंशी साईनाथ कांबळे बबलू जोगदंड विजय करवंजेआदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!