मोहा – दिनांक १२ मे २०२५ रोजी मोहा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहा येथील रहिवासी आणि अंबड तालुका येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक महेश मडके हे उपस्थित होते.यावेळी बोलताना मडके यांनी संपूर्ण जगाला युद्धची नाही बुद्धाची गरज आहे हे आवर्जून सांगितले.यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा अध्यक्ष अशोक कसबे,जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कसबे,सचिव अजय कसबे,शुभम कांबळे,तानाजी कसबे,मोहा ग्रामपंचायत सदस्य महावीर कसबे,राहुल कसबे,मिलिंद कसबे,आश्रुबा नागटिळक, गणेश कसबे,सुखकदेव मडके, अरविंद हिरवे मोठ्या प्रमाणात महिला व समाज बांधव उपस्थित होते सोमनाथ कसबे यांनी उपस्थित सर्व बांधवाना स्वखर्चातून खीर वाटप करण्यात आली.
More Stories
ज्ञान प्रसार प्राथमिक शाळेत नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
ज्ञान प्रसार विद्यालयात गुणवंत शिक्षकांचा सत्कार
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न