पुणे (अशोक आदमाने) – काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती विद्यापीठ प्रशासनातील लोकांकडून हटविण्यात आली होती.या गोष्टीचा विरोध वंचित बहुजन आघाडीप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केला होता. विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवल्यामुळे विद्यापीठाने ५० भिक्कूच्या उपस्थितीत विद्यापीठातील शैक्षणिक विभागाला भेट देण्यात आली. बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी पुन्हा बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळेस सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे शहर अध्यक्ष चैतन्य प्रभाकर इंगळे,उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड,संघटक ओम तांबे,सुरज केळगंद्रे,दिपक कांबळे आदी उपस्थित होते.
More Stories
अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात पुण्यात महाविकास आघाडीची भव्य बाईक रॅली – प्रभाग १७ मध्ये परिवर्तनाचा हुंकार
पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा उघड! पीडित दलित शेतकऱ्यांची ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे धाव
शिंदे सरकार प्रतिष्ठानाच्या संकेत शिंदे यांची पुणे जिल्हा संघटकपदी निवड