कळंब – राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी लातूर येथील ओबीसी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या,बाभळगाव शाळेच्या मुख्याध्यापिका,महिला संघटक श्रीमती रेखाताई सुडे यांची राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे संस्थापक मार्गदर्शक आमदार बाळाराम पाटील,कायदेशीर सल्लागार ॲड.किल्लारीकर,प्रदेशाध्यक्ष अनिल,राज्य सरचिटणीस संतोष भोजने,प्रदेश उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,कार्याध्यक्ष रमेश चव्हाण यांच्या समन्वयातून निवड करण्यात आली.याबद्दल श्रीमती रेखाताई सुडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष लहू राक्षे यांचाही सत्कार करून दोघांनाही पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ ही नोंदणीकृत संघटना असून शिक्षकांचे विविध प्रश्न,समस्या जाणून घेऊन शासन दरबारी त्यावर उपाययोजनासाठी प्रश्न घेऊन लढण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात