कळंब – कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले अनंत उत्तरेश्वर गायके यांचा व्यापारी व यशवंत किसान विकास मंचाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. श्री.गायके यांनी दीर्घकाळ सेवा बजावताना बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवण्यात मोलाचा वाटा उचलला त्यांच्या कार्याची दखल घेत मंचातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण कोल्हे,यशवंत किसान विकास मंचाचे अमोल अण्णा शेळके,व्यापारी आडते प्रमोद बलदोटा,लक्ष्मीकांत जोशी,बालाजी लाखे,हरिपाल रामिष्ट,राखुंडे बाप्पा,डिगंबर शिंदे,केशव शिंदे व श्याम मालपाणी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी अनंत गायके यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड