May 2, 2025

Home »ई-पेपर मुस्लीम वेल्फेअर असोसियशनच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी ॲड.जिनत प्रधान यांची निवड

मुस्लीम वेल्फेअर असोसियशनच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी ॲड.जिनत प्रधान यांची निवड

  • धाराशिव – मुस्लीम वेल्फेअर असोसियशन हि राष्ट्रीयस्तरावर काम करणारी सामाजिक संस्था असून हि समाजातील पिडीत शोषित,वंचित घटकाच्या उन्नतीसाठी काम करणारी संस्था आहे.संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.विशेषतः महिला व बाल कल्याण, आरोग्स,शिक्षण सामाजिक न्याय य ई.विषयावर काम केले जाते. संस्थेच्या माध्य‌मातून देशात आज पर्यंत बरेच उपक्रम राबविण्यात आले आहेत.संस्था उस्मानाबाद जिल्ह्यातील गरजूंच्या उन्नतीसाठी प्रयत्मशील असून.
    संस्थेच्या कार्याला गती देण्यासाठी व विशेष करून महिला मध्ये जनजागृती करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उस्मानाबाद येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड.जिनत प्रधान यांची मुस्लीम वेल्फेअर असोसियशनच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.सदर निवडीचे पत्र संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या हस्ते देऊन त्याचं सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी मुस्लीम वेल्फेअर असोसियशनचे जिल्हा अध्यक्ष अफरोज पिरजादे, जिल्हा व्यवस्थापक रिजवान पठाण,शहर अध्यक्ष वाजीद तांबोळी तसेच मसूद शेख,अक्रम तेली,हमजा मुजावर,चॅद शेख, सादिक शेख व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
error: Content is protected !!