कळंब – तालुक्यातील मौजे घारगाव येथे बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त दि.२९ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी जयपाल कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच हिम्मतराव साळुंखे,पोलीस पाटील विनायकबापू साळुंके,अनिल साळुंके माजी उपसरपंच,संजय पवार उपसरपंच होते. प्रथमतः त्यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना धूप दीप पुष्पाने वंदन करण्यात आले. सूर्यभान कांबळेंच्या नेतृत्वात बुद्धवंदना घेतली.मग पाहुण्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले.यावेळी प्रा.विलास घारगावकर,बौद्धाचार्य सूर्यभान कांबळे,बौद्धाचार्य बबन बनसोडे यांनी प्रासंगिक भाषणे केली. यावेळी बोलताना प्रा.विलास घारगावकर म्हणाले की, महामानवाची जयंती डीजे डॉल्बी वर नाचून नव्हे तर त्यांचे विचार जगून प्रबुद्ध होऊन जयंती करणे कृतिशील अभिवादन ठरेल.तर सूर्यभान कांबळे म्हणाले परमपुज्य डॉ.बाबासाहेबांनी कृषी,पाणी व्यवस्थापन महिलांना सन्मान व सर्वांचे कल्याण साधणारे संविधान दिले आहे ते वाचा,जाणून घ्या. बौद्धाचार्य बबन बनसोडे म्हणाले धम्म जगा, शांततेत आनंदात भीमजयंती करू.तर सरपंच हिम्मतराव साळुंके म्हणाले बुद्ध विहार बांधणीसाठी निधी मिळवून देतो.अध्यक्ष जयपाल कांबळेनी सर्वजण रात्री मिरवणुकीत सहभागी होत आनंदात शांततेत मिरवणूक काढूयात असे नम्र आवाहन केले. याप्रसंगी नारायण कांबळे,नवाब कांबळे,बाबुराव कांबळे,पद्माकर कांबळे,वैभव कांबळे, बाबासाहेब कांबळे,छत्रभुज कांबळे,सुभाष कांबळे, गोजरबाई कांबळे,भामा कांबळे, सिंधुबाई कांबळे,लिंबराज कांबळे,पंकज कांबळे,साहेबराव कांबळे,हणमंत कांबळे,गौतम कांबळे,यावेळी सर्व लहान थोर भीमानुयाई,नागरीक मोठ्या संख्येनी उपास्थित होते.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा