कळंब – ओबीसी जनगणना समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी वर्षाराणी किसन माळी यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. सामाजिक न्याय,स्वतंत्र,समता, बंधुत्व,बंधुता या मूल्यावर आधारित धर्मनिरपेक्ष एकात्मक लोकशाही प्रधान व समाजवादी राष्ट्राची उभारणी करण्याचे संविधानाने स्वीकारलेले ध्येय व उद्दिष्टांशी ओबीसी जनगणना समिती बांधली असून सामाजिक क्रांतीचा तत्वज्ञानाचा प्रचार करून भटक्या विमुक्तसह ओबीसी समाजातील न्युनगंड संपवायचा आहे.पिवळ्या झेंड्याखाली ओबीसी शक्ती निर्माण करण्याचे संघटनेचे उद्दिष्ट आहे.जिल्हाध्यक्षपदी वर्षाराणी माळी यांची निवड झाल्याबद्दल मंगरूळ व परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले