कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ एप्रिल २०२५ सोमवार रोजी भारत देशात समता,बंधुता आणि स्वातंत्र्य ही जीवनमूल्ये जनमाणसांत रुजावी, प्रत्येक व्यक्तीस सामाजिक न्याय मिळावा तसेच ‘जो धर्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो तोच खरा धर्म आहे’ यासाठी आपलं समस्त आयुष्य या देशातील लोकांना समर्पित करणारे महामानवभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल जगताप व डॉ.अनंत नरवडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.रघुनाथ घाडगे यानी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व महान कार्याची ओळख करून दिली.यावेळी महाविद्यालयांतील कर्मचारी प्रा.विनायक मिटकरी,डॉ.रघुनाथ घाडगे, प्रा.विजय घोळवे,प्रा.पंडित शिंदे,प्रा.सोमनाथ कसबे,डॉ. विद्युलता पवार,प्रा.सुनिता चोंदे,श्री.विठ्ठल फावडे,जयसिंग चौधरी,सुंदर कदम,दत्ता गायकवाड,संजीव शेंडगे, दत्ता कोबळ,संजीव शेंडगे,दत्तात्रय गायकवाड,अशोक भोसले तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा