June 23, 2025

राष्ट्रीय चर्मकार महासंघ जनसंपर्क कार्यालयात भीम जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – राष्ट्रीय चर्मकार महासंघ जनसंपर्क कार्यालय कळंब येथे दि.१४ एप्रिल २०२५ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी बाबासाहेब कांबळे यांनी बॅरिस्टर महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक योगदान याबद्दल विचार व्यक्त केले तर प्रा. जालिंदर लोहकरे यांनी शिक्षणामध्ये विश्वरत्न कायदेपंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान सर्वांना सांगितले.प्रा.मधुकर माने यांनी सर्वांनी एकत्र येऊन महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालले पाहिजे असा संदेश दिला.
    यावेळी प्रदीप हौसलमल,आनंद गाडे,राजेश गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष रंगनाथ कदम, तालुकाध्यक्ष अशोक लाड,युवा तालुकाध्यक्ष सतीश कदम, संघटक प्रमोद नरहिरे,सहसचिव श्याम शिंदे,भागवत कदम,सचिव सुहास कदम,रोहन बळी,मोहित कदम,ऋषिकेश कदम,विरेंद्र कदम यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!