कळंब – कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धा तास मराठी वर्तमानपत्राचे वाचन करून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजली जाधव,माजी सरपंच अर्जुन जाधव,ग्रामपंचाय कर्मचारी नवनाथ धेले, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला,वक्तृत्व,उद्देशिका पाठांतर,इंग्रजी शब्द पाठांतर इत्यादी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते लेखणी पेन देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सहशिक्षक धनंजय गव्हाणे, मनीषा पवार,सरोजिनी पोते, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात