देवधानोरा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधानोरा येथे संगणक प्रयोगशाळाचे उद्घाटन अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी सेवासहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने शाळेला सात कॉम्प्युटर 17 खुर्च्या मॅट व आठ व्हाईट बोर्ड शाळेला देण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीशैल कापसे प्रोजेक्ट इंजिनियर,अभिजीत तपिसे प्रोजेक्ट हेड सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई,राम रोकडे प्रोजेक्ट हेड सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई,अनिकेत गमरे सोशल मीडिया हेड सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई,राजेश मोरे कोऑर्डिनेटर सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई,यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण तांबारे केंद्रप्रमुख केंद्र गोविंदपुर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राघवेंद्र बोंदर,शाळेचे मुख्याध्यापक कुंभार बाळकृष्ण यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद आगलावे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हरिदास पांचाळ,नवनाथ तुंदारे,शंकर सुरवसे,बापूराव पाळवदे, आप्पासाहेब कांबळे व भैरू बोंदर यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले