August 9, 2025

मिशन लक्षवेध:खाजगी क्रीडा अकादमींचे होणार सक्षमीकरण

  • धाराशिव (जिमाका) – राज्यातील खेळाडूंना ऑलिंपिकसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आणि उत्कृष्ट क्रीडा संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने “मिशन लक्ष्यवेध” ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.या योजनेअंतर्गत अॅथलेटिक्स,आर्चरी,बॅडमिंटन, बॉक्सिंग,हॉकी,लॉन टेनिस,रोईंग, शूटिंग,सेलिंग,टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडवणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
    खाजगी क्रीडा अकादमींचे वर्गीकरण व आर्थिक सहाय्य अकादमीच्या गुणवत्तेनुसार ३५ ते ५० गुण मिळवणाऱ्या संस्था “क” वर्गात, ५१ ते ७५ गुण मिळवणाऱ्या “ब” वर्गात,तर ७६ ते १०० गुण मिळवणाऱ्या संस्था “अ” वर्गात वर्गीकृत केल्या जातील. “क” वर्ग अकादमींना वार्षिक १० लाख रुपये,”ब” वर्ग अकादमींना वार्षिक २० लाख रुपये,”अ” वर्ग अकादमींना वार्षिक ३० लाख रुपये दिले जाणार आहे.
    हे सहाय्य पायाभूत क्रीडा सुविधा, प्रशिक्षक मानधन,प्रशिक्षण व क्रीडा उपकरणे खरेदी यासाठी दिले जाईल. इच्छुक क्रीडा अकादमींनी दिनांक ४ एप्रिल २०२५ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे सादर करावे.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
error: Content is protected !!