August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

पोलिसांची हद्दपारची कारवाई
कळंब – पोलीस स्टेशन कळंब हद्दीतील अमोल नाना काळे रा. कन्हेरवाडी पाटी ता.कळंब व तानाजी हरी काळे रा. ईटकुर ता.कळंब यांच्यावर पोलीस स्टेशन कळंब येथे वेगवेगळया कलमान्वये गुन्हे दाखल होते. त्यामुळे परिसरात व सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.गुन्हेगारांची गुन्हा करण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता. गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याकरिता म्हणून त्यांच्यावर पोलीस स्टेशन कळंब अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग कळंब,यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता.त्या अनुषंगाने संजय पाटील,उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग कळंब यांनी त्यांना धाराशिव जिल्ह्यातून पुढील तीन महिन्याकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच आणखी पाच गुन्हेगारांनाही संजय पवार सर उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दपार करण्यात येणार आहे.त्यामुळे इतर गुन्हेगारावरती याचा नक्कीच परिणाम होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसू शकतो,असे रवी एस. सानप, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळंब यांनी सांगितले.

धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.24 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 200 कारवाया करुन 55,650 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”

मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.24.03.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 07 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले सुमारे 211 लिटर गावठी दारु, 10लिटर व 100 पाउच सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी विदेशी दारुच्या 45 सिलबंद बाटल्याअसे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 35,300₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 07 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1)उमरगा पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-विनोद बाबु राठोड, वय 35 वर्षे, रा.तलमोड तांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. तलमोउ गावातुन थोरलीवाडी कडे जाणारे चौकात तलमोड येथे अंदाजे 3,600 किंमतीची 35 लिटर गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-विकासबाबुराव वडदरे, वय 35 वर्षे, रा.कराळी पाटी जवळ पत्राचे शेड समोर ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.20 वा. सु. कराळी पाटी जवळ पत्राचे शेड समोर अंदाजे 14,050 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या व 120 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

2)बेंबळी पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सायबा नाना पवार, वय 50 वर्षे, रा. विठ्ठलवाडी ता.जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,050 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-अंजना कृष्णा पवार, वय 33 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव हे 19.50 वा. सु. ताकविकी येथे अंदाजे 2,000 किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-संदेश खंडु कांबळे, वय 24 वर्षे, रा. बामणी ता. जि. धाराशिव हे 15.00 वा. सु. रुईभर ते खामसवाडी जाणारे रोडवरील गुळवे यांच्या शेताजवळ रोडच्या कडेला झाडाखाली अंदाजे 11,000 किंमतीची 10 लिटर व 100 पाउच सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

3)नळदुर्ग पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-तानाजी सोना गायकवाड, वय 60 वर्षे, रा.वत्सला नगर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. वत्सलानगर अणदुर येथे अंदाजे 2,000 किंमतीची 18 लिटर गावठी दारुअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-राम मधुकर शिंदे, वय 33 वर्षे, रा. कुन्साळी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.20 वा. सु. कुन्साळी येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,600 किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

“ जुगार विरोधी कारवाई.”

तामलवाडी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.24.03.2025 रोजी 13.25 ते 14.30 वा. सु. तामलवाडी पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-बाबासाहेब बब्रुवान गवंडी, वय 39 वर्षे, रा. जळकोट ह.मु. तामलवाडी हे 13.25 वा.सु. तामलवाडी ते पिंपळा खु. जाणारे रोडवर चिकन दुकानाचे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 610 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-नेताजी सुर्यभान जाधव, वय 43 वर्षे, रा. गंगेवाडी, ता. दक्षिण सोलापूर हे 14.30 वा.सु. तामलवाडी ते सोलापूर जाणारे पर्यायी रस्त्याजवळ पाण्याच्या टाकीजवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 580 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे स्वतंत्र 2गुन्हे नोंदवले आहेत.

आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.24.03.2025 रोजी 15.30 ते 18.30 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-राजभाउ भिमा कांबळे, वय 44 वर्षे, रा. रा. ज्ञानेश्वर नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 15.30 वा.सु. तेरणा टी पॉईट जवळील पत्राचे शेड जवळ धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 410 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-रोमीत नानासाहेब गुळख, वय 25 वर्षे, रा.आनंदनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.30 वा.सु. जनावराचे दवाखान्या समोरील रोडचे पश्चिम कडेला सिध्दीविनायक जनरल स्टोअर समोर धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.24.03.2025 रोजी 14.30 ते 15.15 वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-नितीन राजभाउ तुकडे, वय 36 वर्षे, रा. अमृतवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.15 वा.सु. तुळजापूर शहरातील स्टॅण्ड समोरील फुटपाथवरील रॉक नावाच्या टपरी लगत मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-अविनाश संजय सातपुते, वय 32 वर्षे, रा.जावळी ता. औसा जि. लातुर ह.मु. अरुणचंद्र बारच्या पाठीमागे तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.30 वा.सु. तुळजापूर शहरातील जुन्या बस स्टॅण्ड समोरील फुट पाथवरील टपरी समोर मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,320 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.24.03.2025 रोजी 19.45 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोडलगत नाझ हॉटेल च्या बाजूस मोकळ्या जागेत पाथ्रुउ चौक धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अजय सोमनाथ माने, वय 22 वर्षे, रा. रामनगर सांजा ता. जि. धाराशिव हे 19.45 वा.सु. धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोडलगत नाझ हॉटेल च्या बाजूस मोकळ्या जागेत पाथ्रुड चौक धाराशिव येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 810 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”

नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-आकाश मधुकर राठोड, वय 25 वर्षे, रा.वत्सलानगर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीचीएक काळ्या रंगाची हिरो स्पेलंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय6859 ही दि.20.03.2025 रोजी 06.00 वा. ते दि. 21.03.2025 रोजी 06.00 वा. सु.आकाश राठोड यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आकाश राठोड यांनी दि.24.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अनिल गजेंद्र हंगरगेकर, वय 52 वर्षे, रा.हंगरगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे हंगरगा तुळ साठवण तलावातील तिर्थ खुर्द शिवारातील एक ॲन्सन कंपनीची 10 एचपी पंप, चार एमएम केबल 30 मिटर काळ्या रंगाची केबल 800 फुट असा एकुण 30,250₹ किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 18.03.2025 रोजी 18.00 ते दि.19.03.2025 रोजी 07.00 वा. सु.चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिल हंगरगेकर यांनी दि.24.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-राजेंद्र भागवत डोके, वय 33 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांचे ईट शिवारातील शेत गट नं 317 मधुन हरभारा पिकाचे 16 कट्टे व 13 कट्टे ज्वारी, एक दोन चाकी डंमपीग ट्रेलर असा एकुण 1,71,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने दि. 22.03.2025 रोजी 19.30 ते 21.45 वा. सु.चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र डोके यांनी दि.24.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

“मारहाण.”

येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-विशाल उर्फ पप्पु सुरेंद्र धालगडे, शाहीन उर्फ चॉद अलि सय्यद दोघे रा. कडकनाथवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.23.03.2025 रोजी 22.30 वा. सु. रत्नापुर पाटीजवळ बांगर हॉटेल शेजारी फिर्यादी नामे-शब्बीर नसीर शेख, वय 45 वर्षे, रा. सांस्कृति सभागृह जवळ येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटरसायकलमध्ये हवा भरण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शब्बीर शेख यांनी दि.24.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- सौदागर महादेव फाटक, उध्दव हनुमंत फाटक, अमर फाटक, संजय दत्तात्रय फाटक, जगन्नाथ फाटक, सर्व रा. वाकडी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.21.03.2025 रोजी 10.30 वा. सु. सुरेश सोनमाळी यांचे घरासमोर रस्त्यावर वाकडी येथे फिर्यादी नामे-कृष्णा रघुनाथ सोनमाळी, वय 40 वर्षे, रा. वाकडी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु माझ्या कडे रागाने का बघतो असे विचारण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कृष्णा सोनमाळी यांनी दि.24.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2), 190, 118 (1), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे- गुरुनाथ नागनाथ वडणे, नागनाथ वडणे, भैरुनाथ नागनाथ वडणे, ज्योती नागनाथ वडणे, संगिता नागनाथ वडणे, सर्व रा. रुईभर ता.जि. धाराशिव यांनी दि.23.03.2025 रोजी 21.00 वा. सु. रुईभर येथे फिर्यादी नामे-बालाजी नामदेव कदम, वय 33 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी कदम यांनी दि.24.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2), 190, 118 (1), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे- नजीर गफुर शेरीकर, फशोद्दिन गफुर शेरीकर, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि.23.03.2025 रोजी 09.00 वा. सु. बेंबळी येथे फिर्यादी नामे-जुनेद मदीन शेरीकर, वय 37 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी लाईट घेण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पक्कडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जुनेद शेरीकर यांनी दि.24.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 117(2), 352, 351(2)(3)(3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

“रस्ता अपघात.”

ढोकी पोलीस ठाणे: मयत नामे- विठ्ठल आबाजी चव्हाण, वय 90 वर्षे, रा. कोळेवाडी ता.जि. धाराशिव हे दि.20.03.2025 रोजी 08.30 वा.सु. कोळेवाडी येथील ग्यानदेव सर्जे यांचे घराचे समोरील रोडलगत थांबले होते. दरम्यान स्कुलबस क्र एमएच 25 ए 5581 च्या चालकाने त्याचे त्याचे ताब्यातील स्कुलबस ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून विठ्ठल चव्हाण यांना धडक दिली. या अपघातात विठ्ठल चव्हाण हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शहाजी विठ्ठल चव्हाण, वय 53 वर्षे, रा. कोळेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.24.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस

 

error: Content is protected !!