कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त स्मारक समितीच्या वतीने मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती,पुतळा परिसर ही निवडण्यासाठी दि.१० मार्च २०२५ वार सोमवार रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे विश्वस्त तथा माजी नगरसेवक डॉ.सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली . यावेळी प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या बैठकीत सर्वानुमते समितीच्या अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड,उपाध्यक्ष रमेश भोसले,सचिव प्रमोद ताटे, सहसचिव अनंत कुचेकर, कोषाध्यक्ष म्हणून सुमित रणदिवे व निलेश गवळी यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रा. अविनाश घोडके यांची निवड करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणेच यंदाही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि सामाजिक जागृतीसाठी प्रेरणादायी उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे. समाज प्रबोधन व महामानवांचे विचार रुजविण्यासाठी समितीने ह्या वर्षी १०,११ व १२ एप्रिल २०२५ रोजी भीम गीते,गीतगायन, व्याख्यानमाला,आणि महामानवांच्या जीवनावर आधारित पोवाडे यांचे आयोजन केले आहे.याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांद्वारे तरुण पिढीला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून दिली जाणार आहे. या समितीचे सल्लागार म्हणून माजी नगरसेवक डॉ.सुनिल गायकवाड,प्रा.डॉ.शंकर कांबळे,शिवाजी शिरसट,दिलीप कसबे,सुभाष घोडके,माणिक गायकवाड,सतपाल बचूटे, चरणसिंह गायकवाड,मोहन गायकवाड,नामदेव गायकवाड,मुकेश गायकवाड,जीवन बचुटे,शहाजी शिरसट,नागेश धीरे,सुशांत गायकवाड,हरिभाऊ गायकवाड,सुरज गायकवाड,सागर पटेकर,प्रशांत हौसलमल,सुयोग गायकवाड,किशोर मगर,शुभम गायकवाड,गौतम शिरसट,मयुर शिरसट यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमामार्फत बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण,समता,न्याय,आणि बंधुता याविषयीचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरित करण्यासाठी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड