कळंब – शहरात बी.आर. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यासाठी एक भव्य मिरवणूक आयोजित करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने जयंती समिती स्थापन करण्यासाठी अभिजित हौसलमल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी रितिक हौसलमल,उपाध्यक्ष सुरज काळदाते,सचिव स्वप्नील राखुंडे व आप्पा राऊत,खजिनदार श्रेयश धावारे, मिरवणूक प्रमुख विनोद समुद्रे, बालासाहेब टोपे,राहुल साखरे, राहुल वाघमारे,सुरज गवळी, कृष्णा हुरगट,संतोष सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. या मिरवणुकीचा उद्देश केवळ उत्सव साजरा करणे नसून,बोधीसत्व डॉ.बाबासाहेबांच्या विचारधारेचा प्रकाश समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आहे. ह्या मिरवणुकीच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे विविध आधुनिक भीमगीते,जी उच्च दर्जाच्या साउंड सिस्टमच्या माध्यमातून वाजवली जातील.ही गाणी केवळ मनोरंजनासाठी नसून,समाज प्रबोधनाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहेत. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता,बंधुता आणि न्यायाचा संदेश या गीतांमधून जनमानसात रुजवण्याचा प्रतिष्ठानचा उद्देश आहे. आकर्षक लायटिंग आणि देखण्या सजावटीने नटलेल्या मिरवणुकीला एक वेगळेच तेज येणार आहे.झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात,भीमगीतांच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईची ऊर्जा आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची निष्ठा शहरभर झळकणार आहे. मिरवणुकीत बोधीसत्व डॉ.बाबासाहेबांचे जीवनकार्य, संविधान निर्मिती आणि सामाजिक सुधारणा यांचे दर्शन घडवणारे देखावेही उभारले जातील,जे नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतील. समता,स्वाभिमान आणि शिक्षणाचा संदेश देणारी ही मिरवणूक समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याचे काम करेल. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आणि त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा,यासाठी प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. या समितीचे मार्गदर्शक म्हणून अभिजीत हौसलमल,अक्षय हौसलमल,देवा समुद्रे,मयुर कसबे,भैय्या टोपे,अक्षय गायकवाड,ताहीर शेख यांची तर जयंती समिती सदस्य म्हणून अजित हौसलमल,सौरभ खंडाळे,प्रशांत गायकवाड,आंतर चव्हाण,निशांत कोल्हेकर,ऋषिकेश शिंदे,साहिल शिंदे यांची निवड केली आहे. या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांशी स्वतःला जोडून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन बी.आर.आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात