मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील ज्ञानप्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर हे होते. कार्यक्रमाला सौ.निर्मला मोहेकर,सौ.सुजाता मडके,सौ.उज्वला परजणे, आरोग्य विभागाच्या सौ.नेहा मुळे,डॉ.विशाल पवार,माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक सूर्यकांत गुंगे,जनार्दन भामरे,अशोक राऊत,एम.एम.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमांमध्ये NNMS परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना व विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना व रांगोळी स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने नेहा मुळे व डॉ.विशाल पवार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.तर शैलेश गुरव यांनी स्पर्धा परीक्षा व त्याचे महत्त्व या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महिला दिनानिमित्त विद्यालयांमध्ये विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या HB व BLOOD GROUP च्या तपासण्या करण्यात आल्या.कार्यक्रमाची सांगता भव्य दिव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.कार्यक्रमास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व सहकारी बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश मडके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नीता सोनवणे यांनी केले वआभार प्रदर्शन प्रा.प्रतिभा सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती नीता सोनवणे,श्रीमती उषा पांचाळ, प्रा.प्रतिभा सावंत, विष्णुदास जाधव,अंगद आगलावे,टोपे मामा,प्रथमेश साडेकर आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन