August 9, 2025

वेद संकुलात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलांर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.१० मार्च २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमांमुळे दलित,शोषित आणि स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
    सध्याच्या शैक्षणिक संकटांचा सामना करताना,सावित्रीबाई फुले यांची शिकवण आणि त्यांची दूरदृष्टी आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. त्यांनी ज्या जिद्दीने शिक्षणासाठी लढा दिला,त्याच प्रेरणेने आजच्या पिढीने समान, समतावादी आणि न्यायसंगत शिक्षणासाठी एकत्र येण्याची गरज आहे.असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
    याप्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक अर्जुन मंडाळे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!