August 8, 2025

पुरुषांनी परस्त्रीला मातेसमान पाहणे गरजेचे – शिवमती ताई बोराडे

  • स्त्री शक्तीचा जागर म्हणजे समाजाच्या उज्वल भविष्याची नांदी घडवू पाहणाऱ्या शिवमती ताई बोराडे यांची जागतिक महिला दिनानिमित्त भेट घेतली.
    दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, तो केवळ महिलांच्या हक्काचा आणि सन्मानाचा उत्सव नसतो, तर समाजाच्या उभारणीत महिलांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची जाणीव करून देणारा दिवस असतो.अशातच एका समर्पित,समाजाभिमुख आणि कार्यशील महिला अधिकारीच्या कार्याची ओळख करून घ्यायची झाल्यास कळंब तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी शिवमती ताई बोराडे यांचे नाव घ्यावे लागेल. समाजातील महिला आणि बालकल्याणासाठी त्यांची अविरत सेवा आणि समर्पण हे खूप महत्त्वाचे आहे.गरोदर महिलांचे सशक्तीकरण,मुलांच्या पोषण आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य एक आदर्श ठरते.महिला बचत गट,पोषण अभियान,अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन आणि महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी खूप उपयुक्त ठरला आहे.त्यांची मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्याने अनेक कुटुंबाचे जीवन उजळले आहे. अशा समर्पित अधिकारी महिलांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून,त्यांच्या प्रयत्नांना सलाम..!
    शिवमती ताई बोराडे यांना जागतिक महिला दिनाच्या सा. साक्षी पावनज्योत परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून त्यांना काही प्रश्न केले ते सा.साक्षी पावन ज्योत च्या वाचकांसाठी देत आहोत.
  • प्रश्न – आपले पूर्ण नाव ? जन्मतारीख ? शिक्षण ? सांगाल काय ?
    उत्तर — माझे पूर्ण नाव शिवमती ताई भगवान बोराडे असून माझे गाव पाथरूड ता.भूम जि. धाराशिव आहे.
    माझी जन्मतारीख २५ जून १९६८ आहे.माझे प्राथमिक शिक्षण पाथरूड येथील जि.प. शाळेत आणि भाऊराव काटे विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले आहे.भूम येथील एस.पी. कॉलेजमध्ये बी.ए,बी.एड पूर्ण झाले. छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.ए. चा फर्स्ट पार्ट केला.
  • प्रश्न – आपण नोकरीस केव्हा आणि कुठे सुरुवात केलीत? उत्तर – वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९९१ ला हाळगाव ता.जामखेड जि.अहिल्यानगर येथे शिक्षीका म्हणून रुजू झाले परंतु दुसऱ्या वर्षीच म्हणजे १९९२ ला नूतन कन्या प्रशाला पाथंरूड येथे मला रुजू करून घेतले असले तरी मला महिला व बालविकासात आवड असल्याने मी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पर्यवेक्षिका म्हणून जुलै १९९३ ला नोकरीस लागले.
  • प्रश्न – आपले लग्न केव्हा झाले? जरा कौटुंबिक माहिती सांगाल का?
    उत्तर – हो माझे लग्न धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी येथील शिवाजी भैरु चौधरी यांच्याशी १९९५ ला झाले.मला दोन मुली व एक मुलगा आहे.दोन्ही मुली डॉक्टर असून एकीचे लग्न झाले आहे. मुलगा सध्या बी.फार्मसी शिक्षण घेत आहे.
  • प्रश्न – नोकरी सोबत जिजाऊ ब्रिगेड संघटनेत केंव्हापासून, कोणत्या पदावर आणि कोणाच्या प्रेरणेने काम करत आहात?
    उत्तर – पर्यवेक्षिका म्हणून फिल्डवर काम करत असतानी महिलावर होणाऱ्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधूता या संविधानिक मुल्यावर काम करणाऱ्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड मध्ये २०१७ पासून धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केले असून आज महाराष्ट्र संघटक या पदावर कार्यरत आहे.महासचिव वनिताई काळे,विभागीय सचिव भास्कर वैराळे यांच्या प्रेरणेने या संघटनेत दाखल झाले.
  • प्रश्न- आपल्या यशाचे श्रेय कोणास देणार?
    उत्तर – मला शिक्षित करून नोकरी करण्यासाठी प्रेरणा देणारे माझे आई-वडील आणि देशमुख गुरुजी यांना माझ्या यशाचे श्रेय जाते.
  • प्रश्न – आपण महिला व पुरुषांना काय संदेश देणार?
    उत्तर — संदेश देण्या इतकी मी मोठी नसली तरी माझी अंतरिक तळमळ म्हणून महिलांनी उच्च शिक्षित व्हावे.स्वरक्षणासाठी कराटे शिक्षण घ्यावे आणि जिजाऊ,सावित्रीच्या लेकी बनण्याचा प्रयत्न करावा.पुरुषांनी सुद्धा उच्चशिक्षित व्हावे आणि परस्त्रीकडे मातेसमान पहावे.
  • जय जिजाऊ – जय सावित्री
  • मुलाखत – प्रा.अविनाश रंजना सुभाष घोडके
    भैरवनाथ अध्यापक विद्यालय, कळंब
error: Content is protected !!