June 21, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 305 कारवाया करुन 2,62,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-रामराजे महादेव शिंदे, वय 35 वर्षे, रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव,विशाल अंकुश चौधरी, वय 21 वर्षे, रा. गोजवाडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.01.03.2025 रोजी ते दि. 02.03.2025 दि. 18.30 वा.सु.हिवरा येथे वाहन क्र एमएच 25 ए.जे.3887 व वाहन कृर एमएच 13 सी. यु. 0524 या दोन्ही वाहना 9 जर्सी गाय व 8 खोंडा वाहनासह 10,90,000₹ किंमतीचे मध्ये जनावरांना आखुड दोरींने जास्त कालावधीसाठी बांधून ठेवून त्यांना पुरेशी हालचाल करता येणार नाही व त्यांचे अन्न पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतुक करत असताना भुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-हाजीअली रमजान नदाफ, वय 29 वर्षे, रा. किसान नगर, अक्कलकोट ता. द. सोलापूर जि. सोलापूर, बिराप्पा पिरप्पा ख्याडे, वय 41 वर्षे, रा. भारतरत्न इंदीरानगर सोलापूर जि. सोलापूर अहमद अमीर मोहम्मद शरीफ, वय 28 वर्षे, रा.राजेंद्र नगर हैद्राबाद,सय्यद उबेद फकरुद्दीन, वय 36 वर्षे, रा. नरसिंग राजेंद्र नगर हेद्राबाद यांनी दि.02.03.2025 रोजी ते दि. 18.30 वा.सु.एनएच 65 हायवे रोउवर अणदुर येथील पुलाखाली क्र एमएच 13 सी. यु. 8899 या मध्ये 9 जर्सी गाय व 3 वासरे वाहनासह 5,96,000₹ किंमतीचे मध्ये जनावरांना आखुड दोरींने जास्त कालावधीसाठी बांधून ठेवून त्यांना पुरेशी हालचाल करता येणार नाही व त्यांचे अन्न पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतुक करत असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5(अ), 5(क), 9(अ) प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (1), (ए)(एफ)(आय) (के) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • भुम पोलीस ठाणे :दि.01.03.2025 रोजी 18.10 ते19.00 वा. सु. हिवरा ते डिसीसी बॅक भुम जवळ 12 ते 15 अनोळखी इसम, यांनी फिर्यादी नामे- अंकुश लक्ष्मण गायकवाड, वय 41 वर्षे, रा. नळी ता. भुम जि. धाराशिव ह.मु. स्वप्ननगरी हाउसिंग सोसायटी विठ्ठल नगर, नेहरु नगर, पिंपरी पुणे यांना व त्यांचे चुलत भाउ श्रीराम गायकवाड अवैध जनावरांचे वाहतुक करणारे पकडल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व रॉडने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अंकुश गायकवाड यांनी दि.02.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),189(2),191(2),191(3),190, 126(2), 324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • कळंब पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे-राहुल तानाजी पवार, वय 27 वर्षे, रा. तेरणा कॉलेज जवळ रमाई नगर धाराशिव व सोबत सचिन राजेंद्र पवार, सुरज संजय काळे, दोघे रा. सोनी जवळा ता. केज जि. बीड हे तिघे दि.02.02.2024 रोजी 22.30 ते 22.45 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 44 एम 0917 यावरुन कळंब ते हावरगाव कडे जाणारे रोडवर कळंब शिवारातील बब्रुवान काळे यांचे घरासमोर रोडवर वळणावर मयत आरोपी नामे राहुल पवार यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून रोडच्या बाजूस असलेल्या झाडाला धडकून स्वत: गंभीर जखमी होवून मयत झाले. तर सचिन राजेंद्र पवार, सुरज संजय काळे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिता तानाजी पवार, वय 35 वर्षे, रा. तेरणा कॉलेज जवळ रमाई नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.02.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125 (ए), 125(बी) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- अंकुश गायकवाड, श्रीराम गायकवाड यांनी दि. 01.03.2025 रोजी 18.00 वा. सु. भुम ते पार्डी रोडवरील पार्डी घाटाचृय खाली हिवरा शिवारातील पुलावर फिर्यादी नामे-विशाल अंकुश चौधरी, वय 21 वर्षे, रा. गोजवाडा ता. वाशी जि. धाराशिव हे व साक्षीदार यांनी दुधव्यवसायासाठी गायी घेवून जात असताना नमुद आरोपींनी फिर्यादी यांचे जनावरांच्या गाड्या आडवून त्यांचेकडे जनावरांच्या पावत्याची मागणी करुन जनावरांमागे 10,000₹ या प्रमाणे पैशाची मागणी करुन पैसे देण्यास नकार दिल्याने धमकी देवून गाड्या पोलीस ठाणे येथे घेवून येण्यास सांगितले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल चौधरी यांनी दि.02.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 308(3), 126(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “जनावरांना ईजा पोहचवणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- देवा शंकर बिराजदार, रा. एकोंडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 28.02.2025 रोजी 13.00 ते दि. 02.03.2025 रोजी 10.00 वा. सु. आडत लाईन उमरगा येथे फिर्यादी नामे-आशोक काशिनाथ बनसोडे, वय 38 वर्षे, रा. कुंभारपट्टी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची खिल्लारी जातीची पांढऱ्या रंगाची गाय अंदाजे 25,000₹ किंमतीची ज्वारीचे पिकात गेल्यामुळे नमुद आरोपीने गायी हकलत आणुन सोडुन फिर्यादी यांना तुझी गाय संध्याकाळ पर्यंत जिवंत राहते काय बघ असे म्हणून निघून गेला असता फिर्यादीची गाय मरुन अंदाजे 25,000₹ चे नुकसान झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आशोक बनसोडे यांनी दि.02.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 325, 324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “पानबुडी मोटर चोरी कारणारे आरोपी गुन्हे शाखा धाराशिव यांनी केले गजाआड .”
  • रामवाडी ता. जि. धाराशिव शिवारातील पानबुडी मोटर चोरी झाल्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे ढोकी येथे गुन्हे दाखल करण्यात आले असुन मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केल्याने दिनांक 03.03.2025 रोजी सपोनि कासार व पथक यांना नमूद गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणातुन काही इसमांची नावे प्राप्त झाल्याने. सदरबाबत पोस्टे मुरुड जिल्हा लातूर हद्दीत जाऊन संशयत इसम ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच चोरी केलेला मुद्देमाल 02 पानबुडी मोटर किंमत 35,000 रुपये तसेच चोरी करताना वापरलेले एक चार चाकी वाहन कि. 8,00,000 रुपये व एक दुचाकी कि 90,000 रुपये असा एकूण 9,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सदरचा मुद्देमाल पोस्ट ते ढोकी गुरनं 75/2025 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यातील असल्याचे अभिलेखावरून स्पष्ट झाले. नमूद गुन्ह्यात आरोपी नामे आकाश पप्पू कसबे रा. दत्तनगर, मुरुड ता. मुरुड जि. लातुर यास ताब्यात घेऊन नमुद आरोपी व मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे ढोकी यांचे ताब्यात देण्यात आले आहे
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!