कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांची खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अनुदान समितीच्या कळंब तालुकाध्यक्षपदी तर निदेशक राजकुमार शिंदे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे वेद शैक्षणिक संकुलनाच्या वतीने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक अर्जुन मंडाळे,आदित्य गायकवाड,दीक्षा गायकवाड,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती. संस्थेच्या तालुक्यातील आयटीआय संस्थांच्या विकासासाठी नवी ऊर्जा मिळेल,अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी