कळंब – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करीत सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक ५ मार्च २०२५ रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली आहे. कळंब तालुक्यात बंद प्रभावी असून शहर व तालुक्यातील व्यापारी पेठा बंद होत्या.कळंब शहरातील सर्व व्यापारी तसेच फळ विक्रेते यांनी बंदला पाठिंबा दिला होता.शहरात १००% कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्त्यांनी एकत्रित येत संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्त्येचा तीव्र शब्दात निषेध केला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर धरणे आंदोलन केले व निषेध व्यक्त केला. याप्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत,हत्या झाल्यानंतर तपास करण्यास उशीर का झाला याची चौकशी व्हावी.फरार आरोपी आंधळे यास तात्काळ अटक करावी या मागण्या कार्यकर्त्यां कडून करण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांचे फोटो हातात घेतले होते व या फोटो खाली ओळी लिहिल्या आहेत.दोघांचेही हाल हाल केले. या विकृती तेव्हाही होत्या आजही आहेत.आम्हाला शंभूराजासाठी लढता आले नाही परंतु आज लोकहितासाठी जगणाऱ्या संतोष भैय्यासाठी लढू.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले