कळंब – सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात महिनाभर उपवास धरत अल्लाहची इबादत करत असतात.इस्लाममध्ये कलमा, नमाज,रोजा,जकात,हज हे पाच प्रमुख तत्व आहे.यात सात वर्षांनंतर रोजा ठेवणे बंधनकारक आहे.रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. कळंब येथील सात वर्षीय जुनैरा आबेद कुरेशी हिने आपल्याला देखील रोजा घरावयाचा आहे, असा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे केला.यंदाचा रमजान महिना कडक उन्हाळ्यात आला आहे,म्हणून आई-वडील तीला नकार देऊ लागले.मात्र जुनैरा काही ऐकेना आणि जुनैराच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनी हार मानत रोजा करण्याची परवानगी दिली तर माहिराने देखील पुर्ण दिवसभर काहीही न खाता-पिता नमाजसह रोजा पूर्ण केला. जुनैरा आबेद कुरेशी (वय ७ वर्ष) चा रोजा पूर्ण झाल्याने तीचे आई,वडिल,मुस्लिम बांधवाकडून,मौलाना,धर्मगुरु, नातेवाईकांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे. जुनैरा ही कळंब येथील सुप्रसिद्ध व्यापारी आबेद कुरेशी यांची मुलगी आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले