June 21, 2025

पाथर्डी येथे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले.रमण इफेक्ट या प्रयोगाबद्दल मनीषा पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम श्रीमती सरोजिनी पोते व सुरेखा भावले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.अंजली यशवंत जाधव यांच्या शुभहस्ते थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात झाले.या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका वंदना पिंगळे,मंदाकिनी काकडे,जनाबाई जाधव,गंधारी धेले,आशाबाई रणदिवे उपस्थित होत्या.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनीषा पवार,सरोजिनी पोते,सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!