कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्युएसी विभाग/अप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दि.28 फेब्रुवारी 2025 शुक्रवार रोजी महाविद्यालयात ‘संगणक कोर्सेस शिकण्यासाठी सरकार च्या विविध योजना’ यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर होते.प्रमुख मार्गदर्शक प्रा.संजयजी घुले (संचालक अप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन कळंब) यांनी वरील विषयासंदर्भातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील भविष्यातील येणाऱ्या करिअरच्या विविध संधी व संगणक कोर्स शिकण्यासाठी विविध संवर्गातील मुलांसाठी सरकारच्या विविध नविन योजना काय आहे ? या विषयाच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हनुमंत माने व सुत्रसंचालन प्रा.शफीक चौधरी यानी केले.आभार डॉ.अनंत नरवडे यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी