कळंब – शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन ढोकी रोडवरील साई मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सुरवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रजवलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मोहेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ सुनील पवार,प्रोग्रेसिव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव करसन पटेल, प्राचार्या लता यंदे उपस्थित होते. यावेळी डॉ.पवार यांनी बोलताना म्हणाले की, स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये वर्षेभर राबवलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये ज्युनिअर केजी पासून इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.व्हेजिटेबल सॉंग,ॲनिमल सॉंग,शेतकरी गीत,देशभक्तीपर गीत,विठ्ठल गीत,गणपती गीत, भरतनाट्यम,लावणी,देवीचा गोंधळ अशा सर्व गीतांचा समावेश करून मॉडेल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे, पालक वर्ग, यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. संस्थेच्या प्राचार्य लता यांदे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड