June 20, 2025

सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो – शुभांगी पाटील

  • कळंब – विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व वाढलेल्या आत्मविश्वासाचा उपयोग भविष्यातील वाटचालीसाठी होतो,असे उदगार मा.सौ.शुभांगी कैलास घाडगे पाटील यांनी स्वप्ननगरी डिकसळ येथे आयोजित स्वप्ननगरी शिवजन्मोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना काढले.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पुजन करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. वर्षा जाधव, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रतिभा भवर गांगर्डे, शिवसेना उबाठा गटाच्या शहरप्रमुख धनश्री कवडे, स्वप्ननगरी सोसायटीच्या संचालीका शोभा माने, डॉ. संजीवनी जाधवर, मुख्याध्यापिका शारदा लाटे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप टोणगे उपस्थित होते, व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    पुढे बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या की,लहान वयात मुलांवर चांगल्या संस्काराची रूजवणूक होत असते.त्यामुळे स्वप्ननगरी शिवजन्मोत्सव समिती ने व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्रोत्यांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक छान व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यांनी आयोजित कार्यक्रमाचे  कौतुक केले. या कार्यक्रमात शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला कळंब, विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर, जि. प. प्रा. शाळा आढाळा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सामुहिक, वैयक्तिक नृत्य सादर केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना भाषण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.संजीवनी जाधवर यांनी केले तर सूत्रसंचलन अर्चना चौधरी- घुटे यांनी केले, तर आभार ज्योती बाराते यांनी मानले. यावेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी,पालक प्रेक्षक उपस्थित होते. स्वप्ननगरी शिवजन्मोत्सव समिती डिकसळ च्या वैचारिक आणि सांस्कृतिक शिवजयंतीचे सर्वत्र कौतुक होत आहे, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल माने, हरिभाऊ मोरे, सागर बाराते,नितीन भाले, अनिल शेळके, सचिन महाकुंडे,अमोल पवार,सुभाष लाटे इत्यादींनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!