धाराशिव – वंचित बहुजन आघाडी जिल्हा धाराशीवच्या वतीने बहुजन राष्ट्रमाता तसेच महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने धाराशिव येथे महात्मा फुले सभागृह तांबरी विभाग येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.शिवाजी गायकवाड (मराठी विभागाचे प्रमुख रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव) म्हणाले तथागत गौतम बुद्धांच्या काळापासून समता आणि स्त्रियांना स्वातंत्र्य वैचारिक बौद्धिक या पद्धतीने सातत्यपूर्ण चळवळीच्या माध्यमातून महिलांच्या बाबतीत समानतेची वागणूक दिली जाते. विनय पिटिक च्या माध्यमातून भंते उपाली यांनी त्या काळात देखील महिला व पुरुष यांना नियम नियमावली यांचे बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केलेले आहे.समाजात परिवर्तन व प्रबोधन केले पाहिजे संतांनी व महापुरुषांनी याबाबतीत नेहमीच आपल्या विचाराच्या माध्यमातून प्रबोधन केलेले आहे.क्रांती म्हणजे संपूर्णता बदल अशा बदलांची गरज आज समाजामध्ये आवश्यक आहे.स्वाभिमान हा माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे म्हणूनच वंचित बहुजन आघाडी ही स्वाभिमानाची चळवळ आहे या चळवळीमध्ये सहभागी होऊन सर्व बुद्धिजीवी कार्यकर्ते यांनी वंचित बहुजन आघाडी ला मदत केली पाहिजे आणि बहुजनांचे राज्य आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाला पाहिजे अशा शब्दांमध्ये प्रा.डॉ.शिवाजी गायकवाड यांनी आपले विचार मांडले. इतिहासातील अनेक दाखले देऊन गायकवाड यांनी उपस्थित जनसमुदायाला जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव.पक्ष प्रवक्ते एडवोकेट के.टी.गायकवाड, इनुस पटेल, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे,प्रा.महेंद्र चंदनशिवे, राजेंद्र धावरे,मिलिंद रोकडे, राजश्री कदम,विजयमाला धावारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सुधीर वाघमारे,शेखर बनसोडे, प्रशांत शिंदे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पांडागळे,धम्मपाल शिंगाडे, अमोल अंकुशराव यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे यांनी केले तर प्रस्ताविक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नामदेव वाघमारे यांनी केले.या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निसार शेख यांनी मानले.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन