कळंब – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तसेंच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवछत्रपती प्रतिष्ठान कळंब च्या वतीने,कळंबमध्ये DCM चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेस खेळाडू आणि क्रीडाप्रेमीकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सलग पाच दिवस या स्पर्धा कळंबमध्ये चालू होत्या,एकूण 16 संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला,प्रत्येक संघाने आपले कौशल्य दाखवले,एकूण 4 टीम बक्षीसासाठी पात्र ठरल्या. यामध्ये सेमिफायनलला रॉयल मित्रप्रेम संघ पारा विरुद्ध प्रतुलराजे संघामध्ये खेळवण्यात आली.यामध्ये रॉयल मित्रप्रेम ने बाजी मारत फायनल मधील आपले स्थान पक्के केले,दुसरा सेमिफायनल सामना डी.सी.सी. डिकसळ विरुद्ध शिवसेवा कळंब अशी खेळवण्यात आली.यामध्ये डी.सी.सी. डिकसळ संघाने बाजी मारली. अंतिम सामना डी.सी.सी. डिकसळ विरुद्ध रॉयल मित्र प्रेम पारा असा खेळवण्यात आला, यावेळी डिकसळ संघाने 39-7 (6.0) चं आव्हान दिलं त्यावर पारा संघाने 42-1 (2.4) अशी खेळी करुन DCM चषकावर पारा संघाने प्रथम विजेता संघ म्हणुन विजय मिळवला. अंतिम सामना पाहण्यासाठी आणि खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी धाराशिव शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्यासह लक्ष्मण हुलजुते,गजानन चोंदे, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते,क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले