कळंब – दोस्ती ग्रुप व शिवसेवा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कळंब येथे गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे “बाप समजून घेताना” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.हे व्याख्यान ढोकी रोड येथील साई मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणार असून,विद्यार्थी,पालक,महिला, यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेवा तालीम संघाचे मार्गदर्शक तथा बाजार समितीचे सभापती शिवाजी (आप्पा)कापसे,दोस्ती तुटायची नाय ग्रुपच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चोंदे, शिवसेवा तालीम संघ शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक (पापा) काटे यांनी केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी