ईटकूर – संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील व सकल मराठा बांधवांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी ईटकूर येथे ग्रामस्थांनी सरकारची प्रतिकात्मक अंत्य यात्रा काढून शासकीय स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत यात्रेत शेकडो महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसापासून अमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी कळंब तालुक्यातील विविध गावातील सकल मराठा समाज बांधवांनी ईटकूर येथे सामुहिक रित्या अमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण तसेच आंदोलने शांततेच्या मार्गाने करुन ही सरकार निष्काळजी व वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होवून मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गंभीरवाडी येथे मागील चार दिवसा पासुन साखळी उपोषण रस्ता रोको व टाॅवरवर चढून सिनेस्टाईलने अनोखे आंदोलन छेडून सरकार चा निषेध केला आहे. या उपोषणा दरम्यान आजपर्यंत वाकडी व ईटकूर येथील दोघांची प्रकृती खालावली असुन त्यांच्यावर कळंब येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचार चालू आहेत. तर उपोषण कर्त्याची प्रकृती खालावत असल्याने ईटकुर व परिसरातील ग्रामस्थ व मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहेत गुरुवारी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रतिमा तयार करून ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गावातून अंत्य यात्रा काढण्यात आली .यामध्ये महिलांचा लक्षवेधी सहभाग होता “”एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाचं…अशा घोषणा देत तरुण-तरुणींनी अंत्य यात्रेतून आक्रमक रूप धारण केल्याचे दिसून आले .गावातील बाजार मैदान ते प्रमुख मार्गावरील रस्त्यावरून स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रा काढून सार्वजनिक स्मशान भूमीमध्ये चिता रचुन सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन अग्नी देण्यात आला..यावेळी अंत्य यात्रेत उपस्थितीत नागरीकांनी अक्षरशः टाहो फोडला होता. तसेच महिलांनी प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. तसेच दशक्रिया विधी ही केला. यावेळी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात