धाराशिव – जर तुमचा पगार असेल तर तुम्ही कमी कर भराल. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर आपल्याला पगार नसेल तर काय? उत्पन्न कुठून येईल? आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे प्रत्यक्षात नोकरी असणे आवश्यक आहे.अर्थमंत्र्यांनी बेरोजगारीचा उल्लेख केला नाही.जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता पण याबाबतीत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पुढे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,अर्थमंत्री निर्मला सीतारमण या विकासाच्या चार इंजिनांबद्दल बोलल्या होत्या.शेती,एमएसएमई,गुंतवणूक आणि निर्यात परंतु याबाबतीत अर्थसंकल्प पूर्णपणे रुळावरून घसरला आहे. बिहारसाठी अनेक घोषणा झाल्या आहेत.हे स्वाभाविक आहे कारण या वर्षाच्या अखेरीस तेथे निवडणुका होणार आहेत. मात्र महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून फार काही मिळाले आहे असे दिसत नाही अशी टीका डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला