August 9, 2025

धाराशिव जिल्हा माहेश्वरी सभेचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

  • कळंब (जयनारायण दरक ) – महाराष्ट्र राज्यातील मागील काही वर्षांपासूनचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, बहुतांश मराठा समाज हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे जमीनधारणेत झालेली घट, अनेकवेळा येणारी अवर्षण परिस्थिती, शेतमालाच्या भावातील अनिश्चितता व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून असणारा वर्ग एका भयावह परिस्थिती मधून जात आहे. यामुळे या वर्गातील मराठा समाजातील नवतरुणांच्या समोर प्रश्नांकीत भविष्य आहे. याच बाबींमुळे सर्व समाज वैफल्यग्रस्त होऊन भयभीत झालेला आहे. याचे दुष्परिणाम आत्महत्येच्या वाढत्या संख्येने समोर येत आहेत.
    समाजात येणारी ही आर्थिक विषमतेची दरी ही सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. तरी या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला माहेश्वरी समाजाचे कार्य करणारी धाराशिव जिल्हा माहेश्वरी सभा मनःपूर्वक पाठींबा देत असून. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊन प्रगतीची दारे उघडावीत ही नम्र विनंती करणारे असे निवेदन देण्यात आले आहे.
    या निवेदनात संजय मुंदडा(जिल्हाध्यक्ष),जवाहरलाल गिल्डा (जिल्हा सचिव),संदीप बिदादा (शहराध्यक्ष),नंदलाल तापडिया,विष्णुदास जाजु,
    लक्ष्मीनारायण जाजू, बालाजी बाहेती,नागेश तापडीया,बालुशेठ बियाणी,रामू करवा,
    अमोल मुंदडा,सुयोग गिल्डा,राहुल जाजू,
    हरी प्रसाद रांदड,अरुण भूतडा,सचीन बिदादा,
    बालाप्रसाद करवा,योगेश मालपाणी,मधुसूदन मालपाणी,निलेश मालपाणी,कृष्णा तापडीया,सत्यनारायण मालपाणी,डॉ.सुयोग काकाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!